Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्हा अपघातमुक्त करणार

नाशिक जिल्हा अपघातमुक्त करणार

नाशिक| प्रतिनिधी Nashik

राज्यातील एकूण अपघाती मृत्यूंपैकी नाशिक जिल्ह्यात १ हजार मृत्यू झाले आहेत. ही चिंतेची बाब असून भविष्यात नाशिक जिल्हा अपघात शून्य नोंद करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केले.

- Advertisement -

१७ जानेवारी १७ फेब्रुवारी पर्यत राज्यात सडक सुरक्षा जीवन रक्षा अर्थात ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक याच्या मार्फत राबवण्यात आले. काल दि. १७ या अभियानाचा समारोप शहरातील कालिदास कला मदिर येथे करण्यात आला. यावेळी वेळी परिवहन आयुक्त ढाकणे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, सहाय्यक परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, नाशिक प्रादेशिक परिवहनचे आरटीआे भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी विनय आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील अपघात कमी कसे होईल यासाठी विचार करून तजज्ञांची मदत घेऊन अभ्यास करण्यात येईल.

ज्याठिकाणी अपघाता होतात त्या क्षेत्राची माहिती घेऊन तिथे जीवनदूत, त्याच प्रमाणे यात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. अपघात कमी करण्यासाठी सर्वांची मदत गरजेची आहे, असा सूर यावेळी निघाला. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त अपघात घडतात.

दुचाकी अपघातात वाढ झाली आहे. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी रस्त्यावर जे काही अपघातात होतात, त्याचा शोध घेऊन अपघात कशामुळे झाला याचे पत्र त्या विभागाला देण्यात येईल. रस्त्यांकडे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदांनी लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले.

यांचा झाला सत्कार

महिनाभर घेण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीमध्ये सहभाग होणारे दुचाकीचालक, शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, अपघातात प्राण वाचवणाऱ्यांचा जीवनदूत म्हूणन सत्कार करण्यात आला. अवयवदान करणाऱ्या मृताच्या नातलगांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आधिकरी कर्मचारी याचा ही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, विनोद साळवी, वासुदेव भगत, हेमंत हेमाडे आदींनी परिसश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या