Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानदी प्रदूषणमुक्ती जनचळवळ व्हावी : आयुक्त जाधव

नदी प्रदूषणमुक्ती जनचळवळ व्हावी : आयुक्त जाधव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नदी प्रदुषण रोखण्यासाठी विशेष कार्य करतांना अशा समविचारी नागरिकांचा यात सहभाग वाढून नदी प्रदुषण मुक्ती ही जन चळवळ झाली पाहिजे. यातून नाशिकमधील जलप्रदूषण कमी होईल, अशी भावना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

महापालिका आयुक्त कार्यालयात आयुक्तांनी सतिश कुलकर्णी व चंद्रकिशोर पाटील यांचा गौरव केला. शहरातील पवित्र गंगा गोदावरीची उपनदी असलेल्या नंदिनी नदीला प्रदुषणाचा विळखा बसला असुन हे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य भावनेतून कार्य करीत इतरांना प्रेरणादायक ठरणारे कुलकर्णी व पाटील यांचा सत्कार सोहळा नुकताच झाला. आयुक्त जाधव यांनी उभयतांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला.

नाशिक मधील रहिवासी सतीश कुलकर्णी हे वयाच्या 70 व्या वर्षी नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असुन त्यांच्या समवेत चंद्रकिशोर पाटील हे देखील काम करीत आहे. नंदिनी नदीच्या तिडके नगर पूल येथे या दोघांनी विजया दशमीच्या दिवशी नागरिकांना नदीपात्रात निर्माल्य टाकू नये, याबाबत आवाहन करून जनजागृती केली. नदीपात्रात पडणारे निर्माल्य संकलित करण्याचा अभिनव उपक्रम राबवून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत आयुक्त कैलास जाधव यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रवीण अष्टीकर व शहर अभियंता संजय घुगे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या