नदी महोत्सवास आजपासून प्रारंभ

नदी महोत्सवास आजपासून प्रारंभ
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात आहे.

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नदी महोत्सवाला (River Festival) वारसा फेरीने (Heritage Walk) आज (दि. १५) सकाळी ७.३० पासून सुरवात होणार आहे...

जिल्हाधिकारी नाशिक, राज्य पुरातत्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सराफ बाजार परिसरातील सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये दि. १५ ते २१ डिसेंबरदरम्यान नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वारसा फेरी व व्याख्याने होणार आहेत.

सकाळी : ७.०० वाजता सुलेखन प्रात्यक्षिक पूजा निलेश व चित्र प्रदर्शन रमेश जाधव व दिपक वर्मा करणार आहेत. सकाळी : ७.३० वाजता गोदेची वारसा फेरी देवमामलेदार महाराज मंदिर, रामकुंडासमोर, गोदाघाट येथून प्रारंभ होईल. वारसा फेरीचे संयोजन व मार्गदर्शन देवांग जानी व रमेश पडवळ करणार आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पुरातत्त्व विभाग उपसंचालक आरती आळे, नासिक इतिहास संशोधन मंडळ अध्यक्ष योगेश कासार-पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समस्त नासिककरांनी वारसा जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.