एसटीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकरभरती बंदीचा धोका

एसटीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकरभरती बंदीचा धोका
MSRTCMSRTC's VRS scheme deceptive

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) नोकर्‍यांमधील खुल्या जागांवर विविध मागास घटकातील सेवकांंच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमुळे रोस्टर पूर्ण झाल्याने एसटीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना (Open Category Candidates) नोकरभरती बंदीचा धोका निर्माण झाला आहे.

इतर शासकीय विभागातील नोकर्‍यांप्रमाणे एसटीमध्येही आरक्षण आहे. अनुसूचित जातीसाठी 13 टक्के राखीव जागा आहेत. तसेच अनुसूचित जमाती 7 टक्के, विशेष मागासवर्ग 2 टक्के, विमुक्त जाती व जमाती 11 टक्के, इतर मागासवर्ग 19 टक्के तर खुल्या वर्गासाठी 48 टक्के आरक्षण आहे.

सध्या महामंडळात 36 हजार 388 चालक, 30 हजार 183 वाहक, 7 हजार 933 सहाय्यक या शिवाय यांत्रिकी सेवक, वाहतूक सेवक, प्रशासकीय सेवक व अधिकारी असे एकूण 97 हजार सेवक व इतर कार्यरत आहेत. खुल्या प्रवर्गासाठीच्या 48 टक्के जागांपैकी मराठवाड्यातील बहुतेक विभागात आतापर्यंत केवळ 20 टक्के जागा भरल्या आहेत.

एसटीमध्ये अलीकडे 2014-15, 2016-17 व 2018-19 अशी तीन वेळा नोकरभरती (Recruitment) झाली. त्यामध्ये विशेषत: चालक (Driver) आणि वाहक व सहाय्यक यांचा समावेश होता. ही भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक उमेदवार मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांमधून भरती झाले होते. परंतु नोकरी लागल्यानंतर यामधील अनेक उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये बदल्या करून घेतल्या आहेत.

सध्या मराठवाड्यातील खुल्या जागांचे रोस्टर पूर्ण झाल्यामुळे भविष्यात खुल्याप्रवर्गातील उमेदवारांसाठी एसटीच्या नोकरभरतीचा मार्ग खडतर झाला आहे, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यातील रोस्टरप्रमाणे खुल्या वर्गाचा कोटा अगोदरच भरला असल्यामुळे स्थानिक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकर भरतीसाठी इतर जिल्ह्यात म्हणजेच कोकण (Konkan) व पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत आहे. नोकर भरतीनंतर तेही इतरांप्रमाणे आपल्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करतात. पण रोस्टर अगोदरच पूर्ण झाल्यामुळे बदलीसाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.

मंत्र्यांचे दुर्लक्ष

राज्यात आतापर्यंत अशोक चव्हाण (Ashok chavan), राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe-Patil), बाबासाहेब भोसले (Babasaheb Bhosale), मधुकर चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण (Pruthvhiraj Chavan), अनंतराव थोपटे, शंकरराव कोल्हे, यांच्यासह अनेक खुल्या प्रवर्गातील नेते परिवहनमंत्री (Minister of Transport) झाले आहेत.

विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) व राज्यमंत्री सतेज पाटील (Minister of State Satej Patil) हे दोघेही खुल्या प्रवर्गातील असून या सर्वांचे बिंदूनामावलीकडे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com