वाहनचोरीचे शुक्लकाष्ट संपेना

डिसेंबरमध्ये 58 वाहनांची चोरी
वाहनचोरीचे शुक्लकाष्ट संपेना
USER

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

शहरात 1 ते 26 डिसेंबरदरम्यान, 58 वाहने लंपास झाली Vehicles Theft असून, 43 मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे खुनाचा एक व प्राणघातक हल्ल्याप्रकरणी Murder तीन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे वर्षअखेरीस पोलिसांना वाहनचोरीचे शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

वर्षअखेरीस डिसेंबर महिन्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात खंडणीचे दोन, खून एक, प्राणघातक हल्ले तीन, विनयभंग सहा, बलात्कार दोन, दरोडा दोन, जबरी चोरीप्रकरणी 10, फसवणूक प्रकरणी आठ, घरफोडीचे 13, चोरीचे 11 गुन्हे दाखल आहेत.

यापैकी काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे तर अनेक गुन्ह्यांचा तपास अद्याप अंधारात आहे. त्याचप्रमाणे वाहनचोरी प्रकरणी 58 व मारहाण, गंभीर दुखापत केल्याप्रकरणी 43 गुन्हे दाखल आहेत. यापैकी वाहनचोरीचे मोजकेच गुन्हे उघडकीस आले असून, मारहाण प्रकरणातील संशयितांची ओळख पटली असली तरी त्यातील काही गुन्हेगार अद्याप फरार आहेत.

आरोपीचे कट्टर समर्थक म्हणून काही युवक मिरवून घेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. धारदार शस्त्रांचा वापर सर्रास होत असून, त्यातून एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढत आहे. तर वाहनचोरीच्या घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही सापडत नसल्याने तो चर्चेचा विषय बनत आहे.त्यातही सराईत चोरट्यांसोबत नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात वळलेलेही वाहनचोरी करताना आढळून येत असल्याने त्यांचा सुरुवातीस माग काढण्यात पोलिसांना फोटो स्टेटस, सोशल मीडियावर ठेवून अडचणी येत असल्याचे बोलले जात आहे.

हाणामार्‍यामध्ये अल्पवयीन मुले

शहरात रस्त्यांवरच किरकोळ कारणांवरून भरदिवसा वर्दळीच्या, रहिवासी भागात हाणामार्‍या होत आहेत. यात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग आढळून आल्याने चिंतेचा विषय बनला आहे.

Related Stories

No stories found.