ऋषभ पंतचा अपघात नेमका कसा झाला? समोर आली मोठी माहिती

अपघातानंतर मदत करायची सोडून पैसे घेऊन पळाले तरुण
ऋषभ पंतचा अपघात नेमका कसा झाला? समोर आली मोठी माहिती

दिल्ली | Delhi

टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला भीषण (Rishabh Pant Car Accident) अपघात झाला आहे. या अपघातात त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा आणि कधी झाला हा प्रश्न सर्वांना पडला असेलच, तर त्याचे उत्तर मिळाले आहे.

रिषभ पंत तेव्हा गाडी चालवत होता, अशी माहिती समोर येत आहे. तेव्हा त्याने नियंत्रण गमावल्यामुळे तो डिवायडरला धडकला. त्यानंतर विंड स्क्रीन तोडून तो बाहेर आला. त्याला कोणतेही फ्रॅक्चर नसून त्याच्या शरीरावरही भाजलेले डाग नाहीत. तो स्थिर असल्याचे दिल्ली क्रिकेटच्या सचिवांनी पीटीआयला माहिती दिली.

हा अपघात शुक्रवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटे या दरम्यान झाला. पंतची मर्सिडीज कार नारसन बॉर्डरवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला तेव्हा तेथिल उपस्थित लोकांच्या मदतीने खिडकीचे काच तोडून त्याला बाहेर काढले गेले. त्याला जर बाहेर काढले गेले नसते, तर मोठी जीवितहानी झाली असती. तो तेव्हा गाडीमध्ये एकटाच होता. तो आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीवरून रुरकीला जायला निघाला होता.

दरम्यान कारला आग लागल्यानंतर ऋषभ पंतने स्वत: कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र गंभीर दुखापतीमुळे तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्याकडे एक बॅग होती. त्याचवेळी अपघातस्थळी पोहोचलेल्या काही तरुणांनी ऋषभला मदत न करता त्याच्या बॅगेतील पैसे काढून तेथून पळ काढला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com