Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

दिल्ली l Delhi

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहेत. आज (बुधवार) पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

- Advertisement -

देशाच्या राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दरात २५ पैश्यांनी वाढ झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ पैसे तर चेन्नईमध्ये २२ पैश्यांनी वाढ झाली आहे. एकंदरीत ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागल्याचे दिसत आहे.

तसेच राजस्थानमधील गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. आयओसी वेबसाईटनूसार सामान्य पेट्रोलचा दर इथं ९८.४० रुपये प्रतिलिटर आहे तर एक्स्ट्रा प्रीमिअमसाठी १०१.१५ रुपये प्रतिलिटरसाठी मोजावे लागत आहेत. राजस्थानच्याच जयपुरमध्ये पेट्रोलचा दर ९३.८६ रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर ८५.९४ रुपये आहे.

राज्यात परभणीमध्ये सगळ्यात महागडं पेट्रोल मिळत आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ८६.७० रुपये इतकी आहे तर आज मुंबईत तो भाव ९२.८६ रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये पेट्रोल दर प्रतिलिटर ८७.६९रुपये, चेन्नईमध्ये ८८.८२ रुपये प्रतिलिटर आहे.

दिल्लीत आज डिझेल ७६.४८ रुपये प्रति लिटरला विकला जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रतिलिटर. ८३.३० आहे, कोलकातामध्ये डिझेलचा दर ८०.८ रुपये आणि चेन्नईमध्ये डिझेलचा भाव ८१.७१ रुपयांवर पोहोचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या