दहीपूल परिसरात दोन गटांत तुफान राडा

दहीपूल परिसरात दोन गटांत तुफान राडा
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आज मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दहीपूल परिसरात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला.

बाचाबाची होऊन सुरू झालेला वाद थेट दगडफेकीवर गेल्यामुळे त्यात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर एकाला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

भद्रकाली पोलीस तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते असे समजते. मात्र, परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com