Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआंध्र प्रदेशातून मागवणार तांदूळ

आंध्र प्रदेशातून मागवणार तांदूळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गोर गरीब कार्डधारक ऐन दिवाळीत धान्यापासून वंचित राहू नये यासाठी कमीत कमी आंध्र प्रदेश येथून दोन रेल्वे अर्थात 480 मेट्रिक टन तांदूळ मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी अन्न महामंडळाकडे मागणी केली आहे.

- Advertisement -

रेशनवर धान्य उपलब्ध होण्यास निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी जिल्हा पुरवठा विंभागाचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात रेशनवरील गहू आणि तांदूळ हा पंजाब राज्यातूनच येत असतो. परंतू पंजाबमध्ये किसान आंदोलन सुरु असून, शेतकरी रुळावरच ठिय्या देऊन असल्याने रेशनचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे धान्य अद्याप पोहचू शकले नाही.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य अद्याप प्राप्त झाले नाही. कारण नाशिक जिल्ह्यास पंजाबवरुन 2400 मेट्रीक टन धान्य येणार होते. तशी व्यवस्थाही अन्न महामंडळाने केली होती. त्यानुसार पीएमजीकेवायचे 240 मेट्रिक टन तांदूळ घेऊन एक ट्रेन आली होती. पण लागलीच पंजाबमधील किसान आंदोलन सुरु झाले. त्यामुळे अद्यापही 7 तांदळाच्या आणि 2गव्हाच्या माल भरुन तयार असलेल्या रेल्वे येऊ शकत नाहीत. त्याचा परिणाम जिल्ह्यास अपेक्षित असलेला 2400 मेट्रीक टन धान्यापैकी 2160 मेट्रीक टन धान्य अद्यापही प्रतिक्षेत आहे. आणि हे आंदोलन केव्हा मिटणार याचीही शाश्वती नसल्याने ऐन दिवाळीत रेशन लाभार्थी हा धान्यापासून वंचीत राहाण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु हा दिवाळीचा महिना असल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवता येणार नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी अन्न महामंडळास कमीत कमी दिवाळीच्या महिन्यात तरी धान्य देण्याची विनंती केली आहे. हवे तर आंध्र प्रदेश येथून दोन ट्रेन तांदूळ तरी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. शिवाय शक्य झाल्यास उत्तर प्रदेश मधून गहू देणे शक्य झाल्यास ते द्यावे यासाठी सतत पाठपुरावा सुरू केला आहे.

पण अद्याप कुठलीही शाश्वती मिळाली नसल्याने संपुर्ण यंत्रणाच चिंतेत आहे. कारण गोर गरीब लाभार्त्यांना ऐन दिवाळीत रेशनचे धान्य न मिळल्यास पुरवठा खात्यासह सरकारवर टीका होईल. विरोधकांना आयतेच कोलीत हाती मिळेल. तसे होऊ नये यासाठी आता पुरवठा विभाग नेटाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे कार्ड धारकही दिवाळीत तांदूळ मिळण्याची आस लावून आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या