Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या उद्योगक्षेत्राला नवसंजीवनी

नाशिकच्या उद्योगक्षेत्राला नवसंजीवनी

नाशिक । रवींद्र केडिया Nashik

नाशिकचे उद्योगक्षेत्राला Nashik Industrial Sector मागील दोन ते तीन दशकांनंतर पहिल्यांदा नवसंजीवनी मिळत असून, जिल्ह्यात विविध ठिकाणी तीन नव्या गुंतवणुका येण्यासोबतच तीन आजारी उद्योगांनी नव्या गुंतवणुकी उभारून उद्योगांची गती पुन्हा सक्षम करण्यास प्रारंभ केला आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक औद्योगिक क्षेत्रात होत आहे.

- Advertisement -

आता गुंतवणूक केवळ उद्योगांनाच सक्षम करणार नसून औद्योगिक क्षेत्राला आलेली मरगळ हटवणेसही महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासोबतच हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने कामगार वर्गही उत्साहीत झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात अक्राळे औद्योगिक वसाहतीमध्ये Dindori- Akrale Industrial Sector रिलायन्स उद्योगसमूहाचा उद्योग स्थिरावू लागला असतानाच, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनेही लागतच मोठा उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. त्या दृष्टीने हालचाली गतिमान झालेले आहेत. त्यापाठोपाठ अक्राळे एमआयडीसीलगत असलेल्या खासगी औद्योगिक वसाहतीमध्ये फार्मासिटिकल उद्योग स्थिरावत आहे. या उद्योगाची पायाभरणी देखील झालेली असून, लवकरच उत्पादन प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. दोनशे ते अडीचशे कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे.

नुकताच जिंदाल सॉ Jindal Saw उद्योगाने हंटिंग एनर्जी सर्विसेससोबत Hunting Energy Services नवा करार करून दीडशे दोनशे कोटी रुपयांचे गुंतवणुकीचा नवा प्रकल्प सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकल्पामुळे जिंदाल सॉ या उद्योगाला आवश्यक असलेले कौशल्य पूर्ण मनुष्यबळ व हंटिंग उद्योगाकडे असलेले तेल व वायू क्षेत्रात लागणार्‍या ड्रिलिंग सीमलेस टीव्ही व किसिंगसाठीचे अद्ययावत तंत्रज्ञान एकत्र होणार आहे. 2020 अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून थ्रेडिंगच्या 3 लाइन्स जोडण्यात येणार आहेत हा उद्योग पूर्णता कार्यान्वित झाल्यास शंभराहून जास्त कामगारांना येथे रोजगार मिळणार आहे.

विद्युत वाहनातील अग्रेसर असणार्‍या हाय टेन्शन विद्युत वाहिन्या घेऊन जाणारा ज्योती स्ट्रक्चर उद्योगसमूह गेल्या काही वर्षांपासून अडचणीत होता. मात्र व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली असून, या माध्यमातून ज्योती स्ट्रक्चरचे ही आधुनिकीकरण लवकरच केले जाणार आहे. त्या दृष्टीने जुन्या यंत्रांची तपासणी, क्षमतांची चाचपणी केली जात आहे. येणार्‍या वर्षभरात हा देखील उद्योग पूर्ण क्षमतेने उत्पादन प्रक्रिया सुरू करणार आहे.

आधीच्या कामगार क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने उद्योग गतिमान होणार असल्याचे वृत्त आहे. सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठा उद्योग म्हणून लौकिक असणार्‍या केबल कॉर्पोरेशन हा उद्योग समूह आजारी झाला होता. या उद्योग समूहाने देखील उद्योगाला पूर्ण जीवन देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची सामंजस्य करार केला आहे. लवकरच या उद्योगाचाही कायापालट होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या