Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यापत्नीला पळवणार्‍याचा काढला काटा

पत्नीला पळवणार्‍याचा काढला काटा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पत्नीला पळवून नेणार्‍याचा शोध घेऊन दोन महिन्यानंतर एकाने पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

नाशिक तालुक्यातील सावरगाव येथील खून प्रकरणाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामिण पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करुन संशयितास अटक केली आहे.

अशोक मोरे (२३, रा. आभाळवाडी, महादेवपुर शिवार) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.९) सावरगाव शिवारात नितीन टबाले (रा. हरसुल, ता. त्र्यंबकेश्वर) याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही समांतर तपास करून मारेकर्‍याचा शोध घेत होते. नितीन यास लोखंडी हुकने डोक्यात मारहाण केलेली, तसेच त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा होत्या.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस खबर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन याचे एका विवाहित स्त्रीसोबत प्रेमप्रकरण होते. व ते दोन महिन्यांपासून सोबत राहत असल्याचे समजले. तसेच त्याचा खून स्त्रीच्या पतीने केल्याचा संशय होता.

पोलिसांनी सापळा रचून महादेव पुर मनोली परिसरातून संशयित अशोक मोरे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीस नकार दिला. मात्र सखोल चौकशीत त्याने नितीनचा खुन केल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या