महाराष्ट्रातून या तारखेपासून मान्सून परतण्याची शक्यता; पण, त्या आधी पुढील ४८ तासांत धो धो कोसळणार

महाराष्ट्रातून या तारखेपासून मान्सून परतण्याची शक्यता; पण, त्या आधी पुढील ४८ तासांत धो धो कोसळणार

पुणे | Pune

एकीकडे परतीच्या पावसाचे वारे वाहत असताना, दुसरीकडे हवामान विभागाने येत्या ४८ तासात मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज वर्तवला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra rain and weather) पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही तासात जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे गोव्यापासून कोकण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, परतीचा पाऊस दणका देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने पावसाचा परतीचा प्रवास नेमके कोणत्या तारखेपासून सुरु होणार याबाबतही महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोकण किनारपट्टीवर खोल समुद्रात चक्रीवादळ होत आहे. त्याचा प्रभाव कोकण आणि गोवा किनारपट्टीवर दिसत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीपासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर सुमारे ११० किमी खोल समुद्रात हे चक्रीवादळ होत असून, पश्चिम-पणजी ते रत्नागिरी दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ ऑक्टोबर नंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. गोवा आणि कोकणात येत्या ४८ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होणार असून पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com