चोरीस गेलेल्या ट्रॉल्या परत मिळल्याने शेतकर्‍यांना पोळ्याचं गिफ्ट

जळगाव । Jalgaon प्रतिनिधी

जिल्ह्यात धरणगावसह वडली येथून ट्रॅक्टरच्या ट्रॉली tractor trolley लांबविणार्‍या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सोमवार, 6 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपाल उर्फ विशाल अशोक पाटील (वय 29) रा. खंडेराव नगर, जळगाव व फैजलखान असलम खान पठाण (वय 21) रा. पिंप्राळा या दोघांना अटक केली आहे.

दोघांकडून तीन ट्रॉल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या ट्रॉल्या trolley परत मिळाल्याने शेतकर्‍यांना पोळ्याचे एकप्रकारे गिफ्ट मिळाले असून या कामगिरीबद्दल शेतकर्‍यांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे आभार मानण्यात आले. अटकेतील संशयित हे वाळू व्यावसायिक असून अवैधपणे वाळू वाहतुकीसाठी त्यांनी ट्रॉल्या चोरुन त्यांचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस अधीक्षकांकडून गंभीर दखल

कमी पावसामुळे तर कधी जास्त पावसामुळे शेतकरी नेहमीच नुकसान सहन करत असतो. दुसरीकडे अशातच शेतकर्‍यांच्या शेतीकामासाठी ट्रॉल्या trolley चोरीस गेल्याने दुष्काळ तेरावा महिना याप्रमाणे म्हणीचा प्रत्यय येवून शेतकर्‍यांना संकट कोसळले होते. बळीराजाप्रती सहानुभूती व ट्रॉली चोरीच्या घटनांची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गंभीर दखल घेतली होती.

तसेच शेतकर्‍यांना त्यांच्या ट्रॉल्या trolley परत मिळवून देण्याच्या सुचना व आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधारक अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, परेश महाजन, हरिष परदेशी, अशोक महाजन, भारत पाटील व विजय चौधरी यांचे पथक नियुक्त केले होते.

अवैध वाळू वाहतुकीसाठी ट्रॉल्यांची चोरी

पथकाने दिवसरात्र एक करत गुन्हयाचा अभ्यास करुन संशयित निष्पन्न केले. फैजलखान व गोपाळ पाटील हे दोघेही वाळू व्यावसायिक अवैधपणे वाळुच्या चोरीसाठी ट्रॉल्या चोरी असल्याचे समोर आल्यानंतर पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघांनी गुन्हयाची कबूली दिली असून त्यांच्याकडून धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्हे व एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक अशा तीन गुन्ह्यांमधील तीन ट्रॉल्या trolley हस्तगत केल्या आहेत.

दोनही संशयिताविरोधात वाळूचोरीचेही गुन्हे दाखल आहेत. महसूल पथकाने पाच दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते. त्या ट्रॅक्टरसोबत चोरीची ट्रॉली trolley असल्याचे समोर आले असून ही ट्रॉली तालुका पोलीस ठाण्यात जमा आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *