Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाचे पुनरागमन, पण नाशिकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत निम्माच पाऊस

पावसाचे पुनरागमन, पण नाशिकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत निम्माच पाऊस

नाशिक

नाशिक (Nashik)जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पावसाचे पुनरागमन झाले आहे. चार तालुक्यांमध्ये ५० मिमी पाऊस झाला. नाशिक तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत अजून निम्माच पाऊस झाला. मागील वर्षी १८ ऑगस्टपर्यंत ५१४ मिमी पाऊस झाला होता. तो आता २१४ मिमीच झाला आहे.

- Advertisement -

बारावीच्या गुणपत्रिका शनिवारपासून मिळणार

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer)पावसाचा चांगलाच जोर होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत १२०० मिमी पाऊस झाला. तो मागील वर्षाच्या तुलनेत २०० मिमीने जास्त आहे. सुरगाणा (Surgana)व इगतपुरी (Igatpuri)तालुक्यात चांगला पाऊस झाला. सूरगाणा तालुक्यातही नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.

२४ तासांत इतका पाऊस

मागील २४ तासांत चार तालुक्यात ५० मिमीचा जवळपास पाऊस झाला. त्यात मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, येवला तालुक्याचा समावेश आहे. नाशिक तालुक्यात फक्त ७ तर चांदवड तालुक्यात ५ मिमी पाऊस झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या