मखमलाबाद रोडवर भीषण अपघात; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

मखमलाबाद रोडवर भीषण अपघात; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
अपघात | Accident

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मखमलाबाद रोडवरील (Makhmalabad Road) क्रांतीनगर नजीक (Kranti Nagar) झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा (Retired police) मृत्यू झाला आहे. भरधाव खासगी बसने (private bus) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे....

आज दुपारी ही घटना घडली. दिलीप वळवी (Dilip Valavi) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बसचा कट त्यांच्या दुचाकीला लागल्याने ते रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली यातच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली. खोळंबलेली वाहतूक कोंडी पोलीस कर्मचाऱ्यांनी दूर करत वाहतूक पूर्ववत केली.

तीन महिन्यांपूर्वीच मयत वळवी हे पोलीस सेवेतून निवृत्त झाले होते. अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com