दहावी परीक्षेचा आज निकाल

दहावी परीक्षेचा आज निकाल

पुणे । प्रतिनिधी Pune

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (State Board of Secondary and Higher Secondary Education) वतीने 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल ( SSC Results -2022 )आज (दि.17) जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल.

राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जून पर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार 20 जून ते शनिवार 9 जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

या संकेतस्थळांवर पहा निकाल

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com