बारावीचा निकाल 31 जुलै रोजी, असे ठरले सूत्र

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती
result
result

सीबीएसई (CBSE) आयसीएसई (ICSE)बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचे सूत्र सांगितले. यासाठी 13 जणांची समिती तयार करण्यात आली होती. दहावी, अकरावी व बारावीच्या प्री बोर्ड रिजल्टला बारावीचा फायनल िरजल्ट बनवण्यात येणार आहे. बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे.

result
आजपासून हॉलमार्किंग सक्तीचे, मग घरातील सोन्याचे काय होणार?

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई 12 वी परीक्षा 2021 रद्द करण्यात आली होती. याच रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल, म्हणजेच या विद्यार्थ्यांना कसे गुण द्यावेत, याचा फॉर्म्युला आज सीबीएसईने कोर्टात सांगितला.

कसा लागणार निकाल

सीबीएसईने (CBSE) न्यायालयात सांगितले की, दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील. त्याचप्रमाणे अकरावीच्या सरासरी पाच विषयांची सरासरी घेण्यात येणार आहे. 12 वीच्या पूर्व-बोर्ड परीक्षा व प्रॅक्टिकल गुण घेण्यात येतील. दहावीच्या गुणांची 30%, 11 व्या गुणांच्या 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल असेल.

28 जूनपर्यंत डेटा पाठवावा लागणार

मूल्यांकन निकष आता फायनल झालं आहे. आता निकालावर काम करणं सुरु होईल. 28 जूनपर्यंत हा डेटा शाळांना पाठवावा लागेल. सर्व डेटा आल्यानंतर सीबीएसई 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर करू शकते. 12 वीचा मूल्यांकन फॉर्म्युला ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीबीएसईला दोन आठवड्यांचा अवधी दिला होता.

ICSE 12चे गुणपत्रक असे तयार होणार

सीबीएसई प्रमाणे आयसीएसईने 12वीच्या निकालाचे सूत्र सांगितले. दहावीचे गुण (प्रोजेक्ट व प्रेक्टिकल ) तसेच 11 व 12वीं चे प्रोजेक्ट, प्रेक्टिकलच्या गुणांच्या आधारावर 12वीं चे गुणपत्रक तयार होईल. मागील वर्षी आयसीएसईने य पद्धतीने गुण जाहीर केले होते. आयसीएसईकडून 30 जुलैपर्यंत 12वीं चे गुण जाहीर करण्यात येणार आहे.

नववी, दहावीचे गुण का?

1. पॅनलच्या सदस्याने सांगितले की, आम्ही केंद्राच्या नवोदय विद्यालय, CBSE आणि इतर शाळांशी चर्चा केली. त्यातून समजले की, यंदाची बॅच पूर्णपणे ऑनलाइन होती.

2. अशा परिस्थितीत फक्त 12 वीच्या प्री बोर्डाच्या आधारे निकाल लावणे योग्य ठरणार नाही. त्यामुळेच 10वी आणि 11वीच्या गुणांचाही या निकालात समावेश करण्यात आला आहे.

3. कमेटी 12वीच्या गुणांना जास्त वेटेज देण्याच्या विचारात आहे. पण, सर्वांच्या विचारानंतर 10वी-11वीला 30-30% आणि 12वीला 40% वेटेज देण्यावर सहमती बनू शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com