नाशिक तालुक्यात सरपंचपदासाठी 'यांनी' उधळला विजयाचा गुलाल, पाहा संपूर्ण निकाल

नाशिक तालुक्यात सरपंचपदासाठी 'यांनी' उधळला विजयाचा गुलाल, पाहा संपूर्ण निकाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाची (Grampanchayat Election Result) रणधुमाळी आज राज्यात पाहायला मिळत आहे. नाशिक तालुक्यातील ओझरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबुराव सीताराम दिवे (८४९ मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हिरामण बाबुराव दोबाडे (४६० मते) यांचा ३८९ मतांनी पराभव केला आहे. सरपंचपदाचे तिसरे उमेदवार सचिन यादव दिवे यांना अवघ्या ७४ मतांवर समाधान मानावे लागले...

सारूळ ग्रामपंचायतीच्या सरळसरळ झालेल्या दुरंगी लढतीत सरपंचपदी मोहन लक्ष्मण डगले (४४२ मते) यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी चंद्रभान दगडू पोटींडे (३९३ मते) यांचा ४९ मतांनी पराभव केला आहे.

वासाळी ग्रामपंचायतीच्या दुरंगी लढतीत आशा उत्तम खेटरे (३८८ मते) या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी रेणुका लक्षमण डहाळे (२९१ मते) यांचा ९७ मतांनी पराभव झाला आहे.

राजूरबहुला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा गुलाब ससाणे (५०८ मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी सुशीलाबाई मधु धुमाळ (३३६ मते) यांचा १७२ मतांनी पराभव केला आहे. सविता जयराम ससाणे यांना ४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

गणेशगाव त्रंबक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली लक्ष्मण ठमके (४४९ मते) यांचा विजय झाला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी जया संदीप लिलके (३५३ मते) यांचा ९६ मतांनी दारूण पराभव केला आहे.

नागलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपचंद गोपाळा पोटींडे (२५७ मते) निवडून आले आहेत. आपले प्रतिस्पर्धी छगन भाऊसाहेब लिलके (१७९ मते) यांचा ७८ मतांनी पराभव केला आहे.

गंगावऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या पंचरंगी लढतीत लक्षमण जगन्नाथ बेंडकुळे (४५२ मते) यांनी जयराम सीताराम गोतरणे (४३९ मते) यांचा अवघ्या १३ मतांनी पराभव केला आहे. दत्तात्रय बछिराम बेंडकुळे यांना २४९ मते, अमोल पोपट धुळे यांनी १७० मते मिळवली. महादेव निवृत्ती डहाळे यांना अवघ्या ४७ मतांवर समाधान मानावे लागले.

दुगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी ज्ञानेश्वर अर्जुन गवे (४४७ मते) यांनी विजय मिळवला. सरपंचपदासाठी ९ उमेदवार रिंगणात होते. गवे यांनी मुरलीधर भानुजी पावडे (३५८ मते) यांचा ११९ मतांनी दणदणीत पराभव केला.

दशरथ पुंजागवे ३३१ मते, मंजुळाबाई गायकवाड (२७६ मते, दशरथ गायकवाड २६६ मते, भास्कर शंकर गायकवाड १४० मते, पुष्पा विष्णू जाधव १०६ मते, पुंडलिक बारकू बेंडकुळे ७९ मते, हरीश भगवान दवे याना ४१ मते मिळाली.

नाईकवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारताबाई बदादे (570 मते) यांनी जिजा निपळूंगे (१९८ मते) यांचा पराभव केला. जातेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सरला बाळू निंबेकर (८८४ मते) यानी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी सोनिया जावळे (११६ मते) यांचा ७६८ मतांनी पराभव केला.

इंदिरानगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चांगुणा बेंडकुळी (४८८ मते) विजयी झाल्या आहेत. माया बेंडकुळी यांनी ३४५ तर सत्यभामा पारधी यांना ६० मते मिळाली.

वाडगाव सरपंचपदी वनिता निंबेकर (५५२ मते) यांनी विजयी गुलाल उधळला आहे. नंदाबाई चहाळे ५१७, स्वाती करवंदे यांना ४४९ मते मिळाली.

गोवर्धन सरपंचपदी गोविंद डंबाळे (१३७१ मते) यांनी बापू डंबाळे (८७७ मते) यांचा ४९४ मतांनी दणदणीत पराभव करत विजयश्री खेचून आणला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com