सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर निर्बंध घाला

केंद्र सरकारची राज्य सरकारला सूचना
सणांच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर निर्बंध घाला
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

दहीहंडी आणि गणेश उत्सवात ( Dahi Handi & Ganesh Festival ) करोनाच्या ( Corona ) संसर्गाचा धोका वाढण्याची भीती असून राज्य सरकारने स्थानिक पातळीवर गर्दीवर( Crowds) निर्बंध घालावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण ( Union Health Secretary Rajesh Bhushan ) यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे ( Chief Secretary of State Sitaram Kunte )यांना पत्र पाठवून केली आहे.

सणासुदीच्या काळात (festive background ) गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इंडियन कौन्सिल आँफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फाँर डिसिज कंट्रोल (एनसीडीसी) संस्थेने उत्सवाच्या काळात होणा-या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सण-उत्सव हे सुपरस्प्रेडर उत्सव होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना या संस्थांनी केल्या आहेत.

सणांच्या काळात करोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याच्या सावधगिरीचा इशारा देतानाच कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने ( State Govt of Maharashtra )केलेल्या कामगिरीचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या पत्रात कौतुकही केले आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसत आहे. पण महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे आगामी सणांच्या काळात सरकारने पुढाकार घेऊन उपाययोजना कराव्यात, असेही भूषण यांनी कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com