Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून आदरातिथ्य सुरु

आजपासून आदरातिथ्य सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे

- Advertisement -

मिशन बिगीन अगेनअंतर्गत सोमवारपासून (दि. 5) 50 टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास जिल्ह्यात संमती देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

पर्यटन विभागाच्या आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेलांसाठी असलेल्या एसओपीच्या सुचना बंधनकारक असेल.

करोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टॉरंटस् कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्, आऊटलेटस्, हॉटेल, रिसॉर्ट, क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह बार यांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

आस्थापनांसमवेत झालेल्या चर्चा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, डब्ल्यूएचओ, युएनडब्ल्यूटीओ, केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच एफएसएसएआय यांनी करोनाकाळात अन्नसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ही एसओपी तयार करण्यात आली आहे.

या एसओपी च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदेश जारी करण्यात येत असून सदर आदेशाचा भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्ती , संस्था अणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग कायदा , 1897 आणि या संदर्भातील शासनाचे तर अधिनिराम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या