Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रunlock maharashtra ; राज्यातील रेस्टॉरंट सुरु करण्याचे संकेत

unlock maharashtra ; राज्यातील रेस्टॉरंट सुरु करण्याचे संकेत

मुंबई:

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहे. ही मार्गदर्शक तत्वे सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.

- Advertisement -

ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई व नागपूर येथील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोविडवर अजून लस किंवा औषध नाही. त्यामुळे करोनासोबत जगताना काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. व्यवसायातून कर रूपात राज्य शासनाला महसूल मिळत आहे. सध्या सरकारला आर्थिक अडचणींना समोरे जावे लागत आहे. मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे,

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबचा निर्णय घेतला जाईल. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे. तसेच रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, सतत हात धुणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या