Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक मनपाच्या प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे

नाशिक मनपाच्या प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे हे उद्या (दि.८) रजेवर जात असून महापालिकेच्या प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेला अद्याप नवीन आयुक्त मिळालेला नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज जवळपास ठप्प झाले आहे.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकिंना मुहूर्त लागत नसताना मागील दीड वर्षापासून आयुक्त हेच मनपाचे प्रशासक आहेत. आयुक्त तथा प्रशासक डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार हे प्रशिक्षण पूर्ण करुन येण्याआधीच त्यांची पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात बदली झाली. त्यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा प्रभार मागील महिनाभरापासून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे होता. पण ते देखील आत‍ा उद्यापासून रजेवर जात आहे.

शासनाने डाॅ.पुलकुंडवार यांची बदली केली पण अद्याप नाशिक आयुक्तपदासाठी कोणाचीही नियुक्ती केली नाही. त्यामुळे प्रभारी प्रशासकाचा पदभार कोणाकडे सोपवला जाईल याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पण शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभारी आयुक्त पदाची जबाबदारी जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांच्याकडे सोपविली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दोन दिवसात निर्णय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले डाॅ.पुलकुंडवार यांची आयुक्तपदावरुन उचलबांगडी भाजप नेत्यांच्या तक्रारीमुळे झाल्याची चर्चा आहे. मात्र त्यांची बदली होऊन चार दिवसांच्या कालावधी झाला तरी नवीन आयुक्त अद्याप महापालिकेला मिळालेले नाही. तरी येत्या दोन दिवसात आयुक्त पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या