
मुंबई | Mumbai
ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Puraskar) गौरवण्यात आले आहे...
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं, अस मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, एखाद्या कुटुंबावर तीन तीन पिढ्या समाजसेवेचा संस्कार मी पहिल्यांदाच पाहिला आहे. यामुळे एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा हा पुरस्कार दिला गेला आहे. या सोहळ्याला मला बोलवले, हे मी माझे भाग्य समजतो. अमित शाह म्हणाले, “कोणत्याही प्रसिद्धीशिवाय आणि आकांशाविना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या एका समाजसेवकाच्या प्रेमापोटी आलेला जनसागर मी प्रथमच पाहिला आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, दिल्लीतून मी केवळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी आलो आहे. ४२ अंशाच्या तापमानात लोकांच्या मनात आप्पासाहेब यांच्याबद्दल मान, सन्मान आणि भक्तीभाव आहे. असा मान, सन्मान आणि भक्तभाव केवळ त्याग, सेवा आणि समर्पणानेच मिळतो.”असे अमित शाह यांनी म्हटले.