केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार
USER

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ( Reshuffle of Union Cabine )आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. मोदी सरकार दुसर्‍यांदा सत्तेत आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नव्हता.

सध्याच्या घडीला अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर आज संध्याकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आज जवळपास 20 नव्या चेहर्‍यांचा समावेश होईल. नव्या कॅबिनेटमध्ये जवळपास दोन डझन मंत्री इतर मागासवर्गीय जातींमधील (ओबीसी) असतील. लहान जातींच्या प्रतिनिधींनादेखील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या कॅबिनेटचे सरासरी शिक्षणदेखील अधिक असेल.

नव्या चेहर्‍यांमध्ये पीएचडी, एमबीए, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचा समावेश असेल. कॅबिनेट विस्तारात राज्य आणि प्रांतांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेहलोत राज्यपाल

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना डच्चू देत यांची मंगळवारी कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. यासह अन्य तीन नेत्यांना राज्यपाल केले गेले आहे. तसेच चार राज्यात फेरबदल करण्यात आले आहेत.

राणे, कपिल पाटलांना संधी?

ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, पशुपती पारस, नारायण राणे, कपिल पाटील, वरुण गांधी यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. हे सर्व खासदार सध्या दिल्लीत आहेत.

महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा विषय तापला आहे. राणे मराठा समाजाचे, तर पाटील ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com