Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणार

नाशकात रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणार

देवलाली कॅम्प| Deolali Camp

नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडलगत खादी ग्रामद्योग महामंडळाची २६२ एकर जमीन आहे.

- Advertisement -

या जमिनीवर बारा बलुतेदारांच्या व्यवसायासाठी रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारल्यास मोठी मदत होणार आहे. या बाबत आपण सकारात्मक असून केंद्राच्या माध्यमातून या बाबद निश्चित निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानी खासदार हेमंत गोडसे यांना दिले.

नागपूर येथील विविध क्लस्टर उद्योगांची पाहणी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून खा. गोडसे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार सुभाष भामरे, खासदार भारती पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झालेले आहेत.

नागपूर येथील विविध उद्योगांची पाहणी केल्यानंतर खा. गोडसे यांनी नामदार नितीन गडकरी यांची भेट घेवून चर्चा केली. खादी ग्रामद्योग मंडळाची देशात सर्वात मोठी तब्बल २६२ एकर जागा नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडलगत आहे.

बारा बलुतेदारांच्या विविध लघू व्यावसायांना चालना मिळण्यासाठी या जागेवर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभाराने गरजेचे आहे, खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने गडकरी यांनी तात्काळ लघु उद्योग विभागाचे संचालक दीप वर्मा यांच्याशी चर्चा केली.

या रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणीच्या कामासाठी जवळपास १०० ते १५० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत चा प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्राकडे सादर करा अशी सूचना गडकरी यांनी अधिकारी वर्गास केली.

या दौऱ्यादरम्यान खा. गोडसे यांनी विविध क्लस्टर उद्योगांसह नागपूर मधे चर्मकार समाजासाठी उभारण्यात आलेल्या चप्पल, बुट उत्पादनाच्या प्रकल्पाची पाहणी केली. याशिवाय इगतपुरी तालुका हा भात पिकांचे माहेरघर असून दरवर्षी जवळपास ३० हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड होऊन सुमारे नऊ लाख पोते तांदूळ उत्पादित होते.

त्यामुळे या ठिकाणी राईस क्लस्टर झाल्यास शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल, यावेळी खा. डॉ. भारती पवार यांनी नाशिकला कांदा क्लस्टर तर खा. डॉ. भामरे यांनी मालेगावसाठी मसाले, बेकरी आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्हयात कॉटन धागा क्लस्टर ( स्पीनिंग )उभारणीची मागणी गडकरी यांच्याकडे केली.

खादी ग्रामद्योग मंडळाच्या जागेवर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग सेंटर उभारणीनंतर उत्तर महराष्ट्रातील बारा बलुतेदार घटकातील लघू व्यवसायिक युवकांना रोजगार निमिर्तीसह त्यांच्या सर्वांगिण विकासाला निश्चितच चालना मिळेल.

– खासदार हेंमत गोडसे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या