Republic Day 2023 : दिल्लीतील ‘कर्तव्य पथा’वर पथसंचलनाला सुरुवात

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली| New Delhi

देशभरात आज 74 व्या प्रजासत्ताक दिनाचा (74 Republic Day) उत्साह असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या (74 Republic Day) निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) होणार्‍या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ (Chitrarath of Maharashtra) सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

दरवर्षी या दिवशी सुरक्षा दलाकडून केल्या जाणार्‍या चित्तथरारक कसरती सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.

महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तीपीठ –

दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ (Chitrarath of Maharashtra) काय असणार? याची सर्वानाच उत्सुक्ता असते. यंदा कर्तव्य पथावर महाराष्ट्राने चित्ररथाच्या माध्यमतातून साडेतीन शक्तीपीठाच दर्शन घडवलं. चित्ररथाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर केला. महाराष्ट्राच्या चित्ररथात देवीजवळ असणारे गोंधळी सुद्धा होते.

कर्तव्य पथावर चित्ररथ

कर्तव्य पथावर भारताच्या संस्कृतीच दर्शन घडवणारे चित्ररथ यायला सुरुवात झाली आहे. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत-बाह्य सुरक्षेच दर्शन या चित्ररथांमधून होतय. कर्तव्य पथावर एकूण 23 चित्ररथ दिसतील. यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे 17 चित्ररथ असतील. त्याशिवाय वेगवेगळी मंत्रालय आणि विभागांचे सहा चित्ररथ असतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *