Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यारस्त्यावरील खड्ड्यांची करा मोबाईलवरून तक्रार; बांधकाम विभागाकडून ॲपची निर्मिती

रस्त्यावरील खड्ड्यांची करा मोबाईलवरून तक्रार; बांधकाम विभागाकडून ॲपची निर्मिती

मुंबई | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अखत्यारीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तसेच उखडलेल्या भागाची नागरिकांना थेट मोबाईलव्दारे छायाचित्र काढून तक्रार करता येणार आहे.

- Advertisement -

त्यासाठी पीसीआरएस नावाचे अॅप सार्वजनिक बांधकाम खात्याने गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध करुन दिले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली.

राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख ५ हजार किमीचे रस्ते बांधले असून ३३ हजार शासकीय इमारती उभ्या केल्या आहेत. विभागाचे पूल, रस्ते आणि इमारती यांच्या संदर्भातली तसेच चालू प्रकल्पाची सर्व माहिती आता पीएमआयएस (PMIS) (प्रोजेक्ट, मॅनेजमेंट इन्फाॅर्मेशन सिस्टीम) पोर्टल व्दारे जनतेला खुली करण्यात आली आहे. सी-डॅकच्या मदतीने सदर प्रणाली तयार केली असून एक प्रकारे हा सार्वजनिक बांधकाम विभागाच डॅश बोर्ड आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात मंत्री दीपक केसरकरांचे मोठे विधान

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचे सनियंत्रण करणे, स्वयंचलित अहवाल बनवणे, टिपण्णी तयार करणे आदी कामे या पीएमआयएस प्रणालीमुळे सहज शक्य होणार आहेत. या प्रणालीमुळे विभाग लोकाभिमुख होईल तसेच विभागाच्या कामात पारदर्शकता येईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व माहिती अशा प्रकारे खुली करणारे महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देशात एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले.

…सरकार पडणार नाही; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का

पीसीआरएस ॲप विषयी..

पीसीआरएस हे मोबाईल ॲप सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची तक्रार करु शकतील. तक्रार आल्यानंतर संबंधितांकडून त्याची दखल घेतली जाईल. या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर तसा मेसेज तक्रारकर्त्यास जाणार आहे. सात दिवसांनी उपअभियंता स्तरावर या तक्रारींच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या