परवानगीशिवाय रस्ता खोदल्यास एफआयआर नोंदवा; महापालिका आयुक्तांचे आदेश

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कधी मोबाईल कंपनी (Mobile company) तर कधी गॅस कंपनी (gas company) अशा विविध कंपन्यांद्वारे शहरातील विविध ठिकाणी मागील काही काळामध्ये मुख्य रस्ते खोदण्यात (Digging main roads) आले आहेत.

यामधील काही कामे महापालिकेची परवानगी (Municipal permission) न घेता करण्यात आल्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार (Municipal Commissioner and Administration Ramesh Pawar) यांनी याबाबत कडक भूमिका घेत सर्व विभागीय अधिकार्‍यांनी आपल्या भागात कोणत्या कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता रस्ता खोदला आहे, याबाबतची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई (Punitive action) करून गरज पडल्यास थेट एफआयआर (FIR) करण्याचे आदेश दिले आहे.

शहरात ठिकठिकाणी अनधिकृतपणे रस्ते खोदून (Unauthorized digging of roads) ठेवले जात असल्याने यातून विद्रुपता तर वाढतच असून पालिकेचे नुकसान होत आहे. सुमारे तीस ते पस्तीस टक्के बेकायदेशीरपणे रस्ते खोदून ठेवले जात आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ही बाब गंभीर असून अनधिकृतपणे रस्ते खोदताना आढळून आल्यास त्याच्याविरुध्द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिग (Maharashtra Regional and Town Planning) या कायद्यानुसार कारवाई करुन संबंधित व्यक्तीची थेट जेलमध्ये रवानगी होणार,

असा इशारा नाशिक पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Municipal Commissioner and Administration Ramesh Pawar) यांनी शहरात बेकायदेशीरपण रस्ते खोदणार्‍यांना दिला होता. तर आज (दि.23) आयुक्तांनी सोमवारी सर्व विभागीय अधिकार्‍यांच्या बैठकित सर्व विभागीय अधिकार्‍यांनी आपल्या भागात ज्या ठिकाणी रस्ता खोदण्यात आलेला आहे तो परवानगी (Permission) घेऊन करण्यात आला आहे का?, याबाबतची खातरजमा करावी तसेच किती कालावधीसाठी तो रस्ता खोदण्याची परवानगी देण्यात आली होती.

याबाबतचा देखील तपशील घेण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे जर परवानगी नसेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करून गुन्हे दाखल होणार आहेत. याबाबत अहवाल तत्काळ महापालिका आयुक्तांना सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

30 मे अंतिम मुदत

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी पावसाळी पूर्व कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी खोदण्यात आलेले विविध प्रकारचे खड्डे 30 तारखेपर्यंत बुजवण्यात यावे, तसेच तोपर्यंत नवीन खड्डे खोदू नये, अशा सूचना देखील आयुक्तांनी केल्या आहेत. यामुळे 30 मे ही अंतिम डेडलाईन असून तोपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

स्पष्ट फलक लावा

ज्या ठिकाणी रस्त्याची किंवा इतर कामे सुरू आहे, त्या ठिकाणी महापालिकेच्या सूचनेनुसार ठेकेदारांनी स्पष्ट फलक लावावा.जेणेकरून नागरिकांना सदर काम कोणी घेतले आहे, कोणत्या स्वरूपाचे तसेच कोणत्या विभागाशी निगडित काम आहे, ते किती दिवसात पूर्ण होणार आहे तसेच कनिष्ठ अभियंतासह संबंधित अधिकार्‍यांचे फोन क्रमांक देखील त्या फलकावर टाकण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत केल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *