Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोडकळीस आलेल्या अंगणवाडया दुरुस्त करा- पालकमंत्री भुजबळ

मोडकळीस आलेल्या अंगणवाडया दुरुस्त करा- पालकमंत्री भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील अंगणवाड्याची दुरावस्था झाली असून विद्यार्थी झाडाखालीबसून शिक्षण घेत आहे. अनेक शाळांमध्ये वीज नाही, हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार गाजला. त्याची गंभीर दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेत मोडकळीस आलेल्या अंगणवाडयांची प्राधान्याने दुरुस्ती करा, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लीना बनसोड यांना दिल्या.

- Advertisement -

शनिवारी (दि.30) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींसह सदस्यांनी अंगणवाडया व शाळा दुरूस्त्यांसाठी निधी नसल्याच्या मागणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनाही शाळा खोल्या बांधणीची मोठी मागणी असून गरज असल्याचे सांगत अतिरिक्त निधीची मागणी केली. कृषीमंत्री दादा भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शाळा दुरूस्त्यांसाठी अगदी कमी निधी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शाळा दुरूस्त्यांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे भुसे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शाळा जीर्ण झालेल्या असून दुरूस्त्यांची गरज असल्याचे झिरवाळ यांनी यावेळी मांडले. जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनीही शाळा दुरूस्तीची सर्वाधिक मागणी असल्याचे नमूद केले. शाळा दुरूस्त्यांसाठी तुलनेने कमी निधी उपलब्ध आहे याकडे आमदार किशोर दराडे यांनी लक्ष वेधले. मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोड यांनी शाळा दुरूस्तीचे तब्बल एक हजार प्रस्ताव तसेच खोल्या बांधकामेच 550 प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचे सांगत अतिरिक्त निधीची गरज असल्याचे सांगितले.

अंगणवाडया बांधकामांना निधी नसल्याचे आ. हिरामण खोसकर यांनी सांगितले. अंगणवाडया बांधकामाची मोठी मागणी प्रस्ताव असल्याचे जि.प. महिला व बालकल्याण सभापती आश्विनी आहेर यांनी सांगितले. आ.कोकाटे यांनी अनेक शाळांमध्ये विज कनेक्शन नसल्याने अंधारात शिक्षणाचे धडे गिरगावे लागतात, संगणक चालवायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला.

आठ वर्षापुर्वी आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाडी बांधकामासाठी तब्बल 36 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यात अंगणवाडयांचे बांधकाम झाले. मात्र अद्यापही अंगणवाडयांचे काम पूर्ण झालेले नाही. ज्या अंगणवाडयांना छप्पर नाही त्यांना प्राधान्य देऊन बांधकामाचे प्रस्ताव सादर करावे. शाळा दुरूस्ती आवश्यक असल्याने त्यासाठी अतिरिक्त निधीसाठी शासनाकडे प्रयत्न केला जाईल.

छगन भुजबळ, पालकमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या