‘त्या’ चौकातील अतिक्रमण हटण्यास सुरुवात; मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून दिल्या होत्या सूचना

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील औरंगाबाद नाका येथील मिरची चौकात एका अपघातामुळे (accidents) बसला आग (Bus fire) लागून निष्पाप लोकांचा बळी गेला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्या ठिकाणी पाहणी करून विविध सूचना केल्या होत्या.

त्यानुसार हा चौक आणखी मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. महापालिकेच्या (Municipal Corporation) नगर नियोजन विभागाने (Town Planning Department) या ठिकाणी अतिक्रमणधारकांना अतिक्रण (Encroachment) काढण्याचे नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान त्याला प्रतिसाद देत अनेक अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे.

सुमारे 13 व्यावसायिकांनी अतिक्रमीत बांधकाम (Encroachment construction) काढले तर अनेक टप-या हटवल्या आहे. अनेकांनी पत्रे ही काढून टाकले आहेत. मिर्ची चौकासह संपूर्ण मार्गावर नगरनियोजन विभागाने अनधिकृत बांधकामाचे (Unauthorized constructions) डिमार्केशन करुन दिल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आली होती.

नोटीस मिळालेल्या अनेकांनी आज स्वत:हून अनधिकृत बांधकाम (Unauthorized constructions) काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील रस्त्याच्या रुंदीकरण कामाला लगेच सुरुवात होणार आहे. मनपा पंचवटी विभागाचे उपअभियंता रविंद्र घोडके, कनिष्ठ अभियंता पंकज बापटे, मनिष ओगळे यावेळी उपस्थित होते. मनपा अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि नगर रचना विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांनी मिर्ची चौकातील अतिक्रमीत बांधकामाची पाहणी केली होती.

दुर्घटना घडल्यानंतर त्वरित मनपाने मिर्ची चौकासह शहरात अतिक्रमण हटाव मोहीम (Encroachment Removal Campaign) सुरू केली आहे.बस अपघाताच्या पार्श्वभूमिवर बांधकाम विभागाने गतिरोधक आणि खडखडाट पट्टीची (रंबल स्ट्रीप) उभारणी केली आहे. तसेच अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावला आहे. रस्त्याचं फॅनिंग करण्यात आले आहे. संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. शहरातील इतर ब्लॅक स्पॉटबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *