Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशओमियक्रॉनचे देशात २५ रुग्ण, अजूनही लसीकरण, मास्क गरजेचे

ओमियक्रॉनचे देशात २५ रुग्ण, अजूनही लसीकरण, मास्क गरजेचे

नवी दिल्ली :

देशात ओमियक्रॉनचे (Omicron) २५ रुग्ण आहे. मागील १४ दिवसांपासून १० हजारापेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. जागतिक परिस्थिती लक्षात घेता देशातल्या सध्याच्या कोविडच्या परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातं आहे. परंतु लसीकरण व मास्क दोन्ही गरजेचे आहे, असे आयसीएमआर(Indian Council of Medical Research)चे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितले.

- Advertisement -

ऑमियक्रॉनचा धोका ओळखून भारतानं आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली. कारण सुरूवातील दक्षिण आफ्रिके(South Africa)त आढलेला ओमिक्रॉन बघता बघता भारतात पोहोचला.ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर त्यांनी अधिकृत निवेदन सादर केलं. त्यात त्यांनी नमूद केलं, की जिथं कोविडचा पॉझिटिव्हीटी रेट (Covid Positivity Rate) ५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्याठिकाणी जिल्हा स्तरावरील निर्बंध लादले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या