रेमडेसिविरची ही बॅच खराब : साईड इफेक्टमुळे वापर थांबवला

रेमडेसिविरची ही बॅच खराब : साईड इफेक्टमुळे वापर थांबवला
रेमडेसिवीर

रायगड:

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असतांना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

Title Name
खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?
रेमडेसिवीर

रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या ५०० कुप्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यातील कोविफॉरची HCL21013 ही बॅच खराब निघाली आहे. साधारण १२० कोरोना रुग्णांवर हे कोविफॉर म्हणजेच रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यात आले. यातील ९० रुग्णांना त्याचे साईड ईफक्ट दिसून आले आहे. या रुग्णांना इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली. यामुळे रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली.

या कंपनीकडून पुरवठा

हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून या इंजेक्शनचा पुरवठा रायगड जिल्ह्यात केला जात होता. या घटनेनंतर या कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबवण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने दिले आहेत. कोविफोर नावाच्या इंजेक्शनच्या HCL21013 बॅचचा वापर न करण्याचे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com