
नवी दिल्ली | New Delhi
गुजरात दंगल प्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे...
गुजरात दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या (SIT) अहवालाला आव्हान देणाऱ्या झाकिया जाफरी (zakia jafri) यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही याचिका कायम ठेवण्यायोग्य नसल्याचे म्हटले आहे. एसआयटीचा 2012 चा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
काँग्रेस नेते एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया जाफरी यांनी एसआयटीच्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गोध्रा हत्याकांडानंतर जातीय दंगली भडकवण्याचा मोठा कट असल्याचा अहवाल एसआयटीने नाकारला होता.
गुलबर्गा सोसायटी दंगलीत काँग्रेस नेते एहसान जाफरी यांची हत्या झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.