लष्कर हद्दीलगतच्या प्लॉटधारकांना दिलासा; 'या' बांधकामास परवानगी

लष्कर हद्दीलगतच्या प्लॉटधारकांना दिलासा; 'या' बांधकामास परवानगी

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp

लष्कर हद्दीलगच्या (Army boundary) 100 ते 500 मीटर अंतरातील भूखंडावरील बांधकामाचा (Construction) विषय मार्गी लागल्याच्या पाठोपाठ संरक्षण विभागाने (Defense Department) महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आता फक्त पन्नास मीटर अंतराचा भूखंड सोडून उर्वरित भूखंडावर बांधकाम करता येणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defence) या निर्णयामुळे लष्कर हद्दीलगतच्या हजारो शंभर मिटरच्या आतील प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी दिली. देवळाली लष्कर कमांडरने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या पत्रान्वये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे (Municipal Commissioner Radhakrishna Game) यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत असलेल्या 100 मीटर हद्दीपर्यंत प्लॉटधारकांना कोणतेही बांधकाम करता येणार नाही. तसेच 100 ते 500 मीटरच्या अंतरावर असलेल्या प्लॉटधारकांना चार मजल्यांपर्यंतच बांधकाम करता येईल, असे आदेश काढले होते.

या निर्णयामुळे लष्कर हद्दीलगतच्या शेकडो प्लॉटधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याची दखल घेत खा. गोडसे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून लष्कर हद्दीलगतच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरावरील भुखंडावर स्टील्ट न पकडता चार मजले किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना वर्षभरापूर्वी परवानगी मिळाली होती. असे असले तरी लष्कर हद्दीपासून लगतच्या 100 मीटरपर्यंतच्या भूखंडबाबतचा निर्णय मात्र प्रलंबित होता.

यासाठी गेल्या वर्षभरात खा. गोडसे यांनी संरक्षण मंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा केला होता. लष्कर हद्दीपासून 100 मीटर अंतराच्या आतील भूखंडावर बांधकामाची अट काहीशी शिथिल करण्यात आली असून यापुढे फक्त पन्नास मीटरचे अंतर सोडावे लागणार आहे. उर्वरित 50 मीटर अंतरावरील भूखंडावर प्लॉटधारकांना बांधकाम करता येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कर हद्दीलगतच्या प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com