Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअनिल परबांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

अनिल परबांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई | Mumbai

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली स्थित साई रिसॉर्टशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) हे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात आधीच सदानंद कदम यांना अटक झाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) याआधी दोघांचीही चौकशी केली आहे. त्यामुळे सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना अटक होताच अनिल परब यांनी त्यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईचा ससेमिरा रोखण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांच्या याचिकेवर आज दि. १४, मंगळवारी सुनावणी झाली.

दापोलीमधील मुरूड येथील साई रिसॉर्टशी (Dapoli Sai Resort scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून (ED) आधी सदानंद कदम आणि त्यानंतर तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना देखील अटक केली होती त्यामुळे परब यांची धावपळ वाढली होती.

विधानभवनाच्या बाहेरच नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, पाहा VIDEO

अनिल परब यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. ईडीने त्यांच्याविरोधात नोंदवलेला ईसीआयआर (Enforcement Case Information Report) रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी तातडीची सुनावणी घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुंबई उच्च न्यायालयात आज, मंगळवारी परब यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आदेश दिले, ईडीने सोमवारपर्यंत अनिल परब यांच्याविरोधात कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे या आदेशात म्हटले आहे त्यामुळे अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणात तूर्तास दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या