Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिओ 'दन दना दन'; ग्रॉस रेव्हेन्यूमध्येही अव्वल

जिओ ‘दन दना दन’; ग्रॉस रेव्हेन्यूमध्येही अव्वल

मुंबई | प्रतिनिधी

जूनच्या पहिल्या तिमाहीत जिओ कंपनीने ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये बाजी मारली आहे. नुकत्याच ट्राय करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका आकडेवारीत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जिओच्या या कमाईमुळे आयडिया व्होडाफोन आणि एअरटेललाही जिओने मागे टाकले आहे.

- Advertisement -

अव्वल स्थानी असलेल्या व्होडाफोन आयडिया या दिग्गज आणि जुन्या टेलिकॉम ऑपरेटर चे वर्चस्व मोडीत काढून तब्बल रु.1521कोटींचा महसूल जिओने प्राप्त केला आहे.

दुसऱ्या स्थानी असलेल्या आयडीया व्होडाफोन चा ग्रॉस रेवेंन्यू रु. 1415 कोटी इतका आहे. एअरटेल तीसऱ्या स्थानी असून त्यांचा या तिमाहीत रु. 895 कोटी रेवेन्यूआहे. % आहे.

जिओने पदार्पणापासूनच आपल्या 100% फोर जी नेटवर्क आणि स्वस्त डेटामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले.

जिओफोनमुळे अतिशय परवडणाऱ्या दरात ग्राहकांना डिजिटल क्रांती पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. केवळ 4 वर्षात जिओचे महाराष्ट्रात 3.30 कोटी समाधानी ग्राहक असून 3 कोटींचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे जिओ कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या