Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशमुकेश अंबानींची घोषणा : रिलायन्स, गुगलसोबत मिळून लॉन्च करणार ‘जिओफोन नेक्स्ट’

मुकेश अंबानींची घोषणा : रिलायन्स, गुगलसोबत मिळून लॉन्च करणार ‘जिओफोन नेक्स्ट’

नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४वी वार्षिक महासभा (AGM ) आज (गुरुवार) झाली. यामध्ये रिलायन्स जिओ 5G सेवा सुरू करण्यासारखी महत्त्वपूर्ण घोषणा केली. जिओ व गुगलचा एकत्रित प्रॉडक्ट असलेले ‘जिओफोन नेक्स्ट’ ची घोषणा केली. हा फोन १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थीला बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे. हा फोन बाजारातील सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केला.

- Advertisement -

Jio Phone Next या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण ४ हजार रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

सौरऊर्जेविषयी मोठी घोषणा

सौरऊर्जेविषयीची (Solar Energy) मुकेश अंबानी यांनी महत्वाची घोषणा केली. त्यांनी असे म्हटले की, ‘मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, जामनगर याठिकाणी ५००० एकर जागेवर Dhirubhai Ambani Green Energy Giga Complex उभारण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ही सुविधा जगातील सर्वात मोठ्या अशा इंटिग्रेटेड नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादनांपैकी ही एक असेल. २०३० पर्यंत रिलायन्स कमीतकमी १००GW सोलर एनर्जी स्थापित करेल. छतांवरील सोलर आणि खेड्यातील विकेंद्रीकृत इन्स्टॉलेशन हे यातील महत्त्वाचे मुद्दे असतील. ग्रामीण भागासाठी लाभ आणि समृद्धी यावी याकरता हा निर्णय असेल. येत्या १५ वर्षात रिलायन्स ही झिरो कार्बन उत्सर्जन करणारी कंपनी असेल, असा संकल्प यावेळी मुकेश अंबानी यांनी जाहीर केला.’

भारताला 2G मुक्त करणार

मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त करणार असल्याचे सांगितले. 5G इकोसिस्टम विकसित करण्यासाठी बाजारपेठेत 5G ला सपोर्ट करणारी उपकरणे आली पाहिजेत. त्यासाठी रिलायन्स आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत मिळून काम करत आहे. रिलायन्स जिओमुळे भारताला फक्त 5G तंत्रज्ञानच मिळणार नाही तर देश 2G मुक्त होणार असल्याचा दावा मुकेश अंबांनी यांनी केला.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी रिलायन्स कंपनी आगामी काळात उर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता डिजिटल क्षेत्रापाठोपाठ उर्जा क्षेत्रातही रिलायन्स कंपनी सुपरपॉवर होण्याच्या दिशेने पहिले पाऊस पडले आहे. रिलायन्स उर्जा क्षेत्रात ६० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

जिओसह अनेक टेलीकॉम कंपन्यांना दूरसंचार विभागाकडून देशातील 5G सेवांची चाचणी घेण्याची परवानगी मिळाली आहे. अलीकडेच जिओने मुंबईत 5G फील्डची चाचणी केली आहे. लवकरच इतर शहरांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे. खनिज तेलापासून दूरसंचार आणि किरकोळ व्यापार क्षेत्रात विस्तरलेल्या रिलायन्स समूहाने कोरोना संकटात देखील दमदार कामगिरी केली आहे. समूहाचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्जमुक्त केले आहे. नवनव्या क्षेत्रात विस्तारण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या मुकेश अंबानी यांच्याकडून आज अनेक मोठ्या घोषणा केल्या.

शेअर बाजारावर परिणाम

रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष होते. सभा सुरु होण्यापुर्वी रिलायन्सच्या शेअरमध्ये काहीशी घसरण होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या