निवडणुकीत मतदानासाठी नाव नोंदवा

राज्य निवडणूक आयुक्त मदान यांचे आवाहन
निवडणुकीत मतदानासाठी नाव नोंदवा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून voting किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे Election Commission of India 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान State Election Commissioner U. P. S. Madan यांनी मंगळवारी केले.

भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणार्‍या विधानसभा मतदारसंघांच्याच मतदार याद्या महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावात किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरुपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावाची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावातील अथवा पत्त्यांमधील दुरुस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे, असे मदान म्हणाले.

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी 1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून आणि समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबवली जात आहे, अशी माहितीही मदान यांनी दिली.

जोडावयाची कागदपत्रे

वय व जन्मतारखेच्या पुराव्यासाठी सक्षम अधिकारी यांनी दिलेले जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा पुरावा म्हणून 5 किंवा 8 किंवा 10 वीच्या गुणपत्रिकेची प्रत, भारतीय पारपत्र, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, आधारकार्डची प्रत तसेच रहिवासी पुराव्याकरता बँक, किसान, टपाल कार्यालय चालू खाते पुस्तक, शिधावाटप पत्रिका, पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, आयकर निर्धारण आदेशाची प्रत, अलीकडील नोंदणीकृत भाडे करार, पाणी, दूरध्वनी, वीज, गॅस जोडणी बिलाची प्रत, भारतीय टपाल विभागाद्वारे अर्जदाराच्या नावे त्यांच्या सर्वसाधारण निवासस्थानाच्या पत्त्यावर प्राप्त झालेले कोणतेही टपाल किंवा इ-मेलची प्रत इत्यादी कागदपत्रांपैकी जन्मदाखला व निवासस्थानाचा कोणताही एक पुरावा अर्जासोबत जोडण्यात यावा. यासोबतच पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (3.5 से.मी.बाय 3.5 सें.मी.) सह प्रत्येक इंचास 200 टिन (डीपीआय) अर्ज भरतांना संकेतस्थळावर अपलोड करणेत यावे.

मतदार नोंदणी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी- 1 नोव्हेंबर 2021

प्रारूप मतदार याद्यांवर दावे आणि हरकती दाखल करणे- 30 नोव्हेंबर 2021

दावे आणि हरकती निकाली काढणे- 20डिसेंबर 2021 पर्यंत

अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी-5 जानेवारी 2022

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com