राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार? वडेट्टेवारांनी केले हे वक्तव्य

राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार? वडेट्टेवारांनी केले हे वक्तव्य

मुंबई

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain ) राज्यातील काही भागात तुफान पाऊस (heavy rain)कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar)यांनी याच नुकसानीचा आढावा घेतला आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार? वडेट्टेवारांनी केले हे वक्तव्य
धर्मांतराचे जाळे : नाशिकमधील कुणाल असा झाला आतिफ

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray )यांनीही राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. याविषयावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ काही जिल्ह्यात जाहीर करायचा का याबाबत विचार सुरु आहे. नुकसानग्रस्त जिल्ह्यातील माहिती गोळा झाल्यावर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले.

मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यातील 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाऊस ओसरला की 100 टक्के पंचनामे पूर्ण होतील. राज्य सरकारकडून NDRF च्या निकषाप्रमाणे मदत होईल, असंही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.