Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याकाळजी-आधार केंद्र संख्येत घट

काळजी-आधार केंद्र संख्येत घट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतातील काळजी व आधार केंद्रांची संख्या कमी करून 310 वरून 188 केल्यामुळे एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या व्यक्तींना पुरवल्या जाणार्‍या सेवांच्या तरतुदींत अडथळा निर्माण झाला आहे.

- Advertisement -

एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या समुदायाचे स्थानिक व राष्ट्रीय प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. ग्लोबल फंड (2024-2027) च्या आगामी नवीन टप्प्यात एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या व्यक्तींसाठी असलेले काळजी व आधार केंद्र कमी करून 188 केल्यामुळे समुदायाबद्दलची चिंता त्यांच्यासमोर मांडण्यात आली. मंत्र्यांनी म्हणणे ऐकून घेऊन अतिरिक्त सचिव तसेच आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय महासंचालक यांच्याकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

एचआयव्ही संसर्ग कमी करण्यासाठी समुदायाने केलेल्या चांगल्या कामाची डॉ. पवार यांनी दखल घेतली. शबाना पटेल यांनी समाधान व्यक्त केले. सध्याच्या काळजी व आधार सेवांमध्ये भारतातील सर्व एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या व्यक्तीचा समावेश असणे आवश्यक आहे. याची खात्री करण्यासाठी त्यांनी मंत्र्यांंना विनंती केली. महेंद्र मुळे यांनी नाशिक जिल्ह्यातील एचआयव्हीसह जीवन जगणार्‍या 8,500 व्यक्तींसाठी सातत्याने घेण्यात येणारी काळजी व त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न कायम ठेवल्याचे नमूद केले. डॉ. पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे मान्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या