Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाची उसंत; धरणांतून विसर्गात कपात

पावसाची उसंत; धरणांतून विसर्गात कपात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या गुरुवारंपासून सुरु झालेल्या पावसाने( Rain) काल नाशिक शहरात थोडी विश्रांंती घेतली.त्यातच धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या विसर्गातही कपात(Reduction in water discharge) झाली.मात्र होळकर पुलाखालून साडेदहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरु राहिल्याने पुराची पातळी परवा पेक्षा काल थोेडी कमी झाली. मात्र धोका टळलेला नाही. आतापर्यंतच्या पावसाने धरणे 75 टक्के भरली असून दहा जण पुरात वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह आतापर्यंंत हाती लागले असून सात जण अद्यापही बेपत्ता आहेत.

- Advertisement -

सध्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्रंंबक तालुक्यात दमदार पाऊस कायम आहे. गंगापूर, दारणा, नांदुरमध्यमेश्वर धरणातून अजुनही पाण्याचा विसर्ग सुरुच असल्याने गोदावरी, दारणा नदीचा पूर अद्याप कायम आहे.आज सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली.थोडे सूर्यदर्शऩ झाले. ढगाळ वातावरण होते.मात्र पाऊस झाला नाही.धरणातून विसर्ग सुरु असल्याने नदीच्या पातळीने कमी होण्याचे नाव घेतले नाही.त्यामुळे जनजीवन बर्‍यापैकी पुर्वपदावर येण्यास मदत झाली.मात्र नदीकाठी पुरामुळे अद्याप व्यवसाय ठप्पच आहे.

काल दारणातून 10670,कडवातून 3233,गंगापूरमधून 7128, आळंंदी धरणातून 961 क्युसेकचा विसर्ग सुरु होता. होळकर पुलाखालून 10502 क्युसेकने पाणी वाहत होते.पाऊस थांबल्याने थोडा दिलासा मिळाला.

पेठ तालुक्यातील घोटविहिरा व उंबरमाळ येथील शंभर मीटर रस्त्याला तडे गेले असून माती ढासळण्यासह झाडेही उन्मळून पडल्याची माहिती तहसीलदार संदिप भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या ठिकाणाला भेट दिली असून तेथे राहणार्‍या रहिवाश्यांशी चर्चा करून त्यांचे तात्काळ स्थलांतर करून त्यांना दिलासा दिला आहे. दहा कुटुंबांचे घोटविहिरा गावातील रिकामी घरे, समाज मंदिरात व खरपडी आश्रमशाळेत स्थलांतर करताना त्यांची भोजनाची व्यवस्था करून तेथील नागरिकांना व कुटुंबियांना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यशी संवाद साधून दिलासा दिला आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी संदिप आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक वारूळे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार व ग्रामस्थ उपस्थित होते.

दारणा नदीचा पूर अद्याप कायम आहे. काल सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली.थोडे सूर्यदर्शऩ झाले. ढगाळ वातावरण होते.मात्र पाऊस झाला नाही.धरणातून विसर्ग सुरु असल्याने नदीच्या पातळीने कमी होण्याचे नाव घेतले नाही.त्यामुळे जनजीवन बर्‍यापैकी पुर्वपदावर येण्यास मदत झाली.मात्र नदीकाठी पुरामुळे अद्याप व्यवसाय ठप्पच आहे.

काल दारणातून 10670,कडवातून 3233,गंगापूरमधून 7128, आळंंदी धरणातून 961 क्युसेकचा विसर्ग सुरु होता. होळकर पुलाखालून 10502 क्युसेकने पाणी वाहत होते.पाऊस थांबल्याने थोडा दिलासा मिळाला.

जोर ओसरणार

गेल्याकाही दिवसांपासून राज्यभरात थैमान घातलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मुसळधार ते अतिवृष्टीत घट होणार असली, तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात आणखी काही दिवस कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

संततधारेचा 1241 हेक्टरवरील पिकांना तडाखा

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे 1241 हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे.यात प्रामुख्याने मका, सोयाबीन व भात या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.सुरगाणा तालुक्यात 52 हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले आहे. मक्याचे 325 हेक्टर, सोयाबीनचे 740 हेक्टर, भाजीपाला व ऊस पिकाचे 65 हेक्टर नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. निफाड, कळवण, दिंडोरी या तालुक्यांत प्रामुख्याने सोयाबीनचे तर कळवण, देवळा मकाचे तसेच इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात भाताचे नुकसान झाले आहे.

जायकवाडी 50टक्के भरले

जायकवाडी धरणात नाशिकहून आतापर्यंत 16 टीएमसी पाणी रवाना झाले आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 50 टक्के भरले असून ऑगस्टपर्यंत 75 टक्के भरल्यास पुन्हा गंगापूरमधून जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. तसेच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या चार दिवसाच पावसाने हजेरी लावल्याने नाले ओढ्यामध्ये चांगलेच पाणी वाहत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या