
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे....
तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. हा पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला १४ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.
पावसामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.