Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रIMD राज्यातील पाच जिल्ह्यात रेड अलर्ट, नाशिकसाठी काय ?

IMD राज्यातील पाच जिल्ह्यात रेड अलर्ट, नाशिकसाठी काय ?

मुंबई:

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेध शाळेनं (IMD)राज्यातील ५ जिल्ह्यांना रेड अ‌ॅलर्ट (Red alert) जारी केला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये कोकणातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. नाशिक (Nasik) जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट (yellow alert)देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी याबाबत टि्वट केले आहे.

- Advertisement -

केंद्रानंतर राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे, या दोन मंत्र्यांना धोका

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागानं आजच्यासाठी रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, पालघर सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

२२ व २३ जुलै रोजी पावसाचा अंदाज काय?

२२ जुलै : सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

२३ जुलै : सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी,पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या