मनपात 'इतक्या' पदांसाठी होणार भरती

मनपात 'इतक्या' पदांसाठी होणार भरती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेतील (municipal corporation) नोकर भरतीसाठी (Recruitment of employees) 35 टक्के आस्थापना खर्चाची अट शासनाने शिथिल केल्यानंतर टीसीएस (TCS) या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत 704 पदांची भरती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी लवकरच टीसीएस (TCS) या संस्थेशी करार करण्याची तयारी सूरू झाली असल्याचे वृत्त आहे. महापालिकेने गेल्या 23 वर्षापासून महापालिकेत नोकर भरती (Recruitment of employees) केलेली नाही. 1999मध्ये भरती करण्यात आली होती. त्यात ही रोजंदारी वरील कर्मचार्‍यांना कायम करण्यात आले होते. काही अनुकंपा नियुक्त्या दिल्या होत्या.

माजी महापौर बाळासाहेब सानप (Former Mayor Balasaheb Sanp) याच्या कार्यकळात भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र नंतर ती रद्द करण्यात आली. त्यामुळे 1999 नंतर तब्बल 23 वर्षापासून महापालिकेत नोकर भरती केलेली नाही. पदोन्नत ’ब’ संवर्गानुसार मान्यतेसाठी 14 हजार पदांचा सुधारित आकृतीबंध सादर केला आहे. मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही.

ही भरती निपक्षपातीपणे करण्यासाठी टिसीएस किंवा आयबीपीएस (IBPS) या संस्थेच्या माध्यमातून भरतीच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने आयबीपीएस संस्थेसमवेत कराराची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र आयबीपीएस संस्थेने अगोदर महापालिकेशी करार करण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी कराराचा कच्चा मसुदा तयारही करण्यात आला होता.

महापालिकेने त्यात आपल्या काही अटी, शर्तींचा समावेश केल्यानंतर आयबीपीएस संस्थेने त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिकेने टीसीएस या संस्थेशी संपर्क साधून त्यांना गळ घातली. त्यांनी प्रतिसाद दिल्याने लवकरच या संदर्भात करार केला जाण्याची शक्यता आहे. या नोकरभरतीसाठी (recruitment) पूर्वी अडसर ठरत असलेल्या 35 टक्के आस्थापना खर्च मर्यादेची अटही शासनाने आता शिथिल केली असल्याने भरती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

704 पदांना मान्यता

मनपा आस्थापनाचे विविध संवर्गातील 7090 पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास 2800 हून अधिक पदे रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागाच्या 348, वैद्यकीय व आरोग्य विभागातील 358 अशा एकूण 704 पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे.

वरिष्ठ पदांवर पदोन्नती गरजेची

गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देताना मनपाच्या प्राासकिय कामांचा परीपूर्ण अभ्यास असताना त्या अनुभवी लोकांना डावलून परसेवेतील अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येते. गुणवत्ता व क्षमता असताना आयुष्यभर त्याच जागेवर रखडण्यातून काही वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नवीन परसेवेतील अधिकारी नेमण्यापूर्वी स्थानिक अधिकार्‍यांची गुणवत्ता व सेवेतील ज्येष्ठता तपासण्याची मागणी मुळ धरत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com