Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात शिक्षक भरतीची बंपर लॉटरी; लवकरच ३० हजार पदांची भरती

राज्यात शिक्षक भरतीची बंपर लॉटरी; लवकरच ३० हजार पदांची भरती

मुंबई | Mumbai

 शिक्षण क्षेत्रातील बेरोजगार तरुणांसाठी लवकरच लॉटरी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिक्षक भरतीकडे (Teacher Recruitment) डोळे लाऊन असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे…

- Advertisement -

राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची (Teacher) भरती होणार असल्याने आता शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी याविषयीची माहिती सभागृहात दिली. या शिक्षक भरती बाबतची तयारी  सुरू असून लवकरच सविस्तर माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

राज्यातील शाळांमधील (Schools) शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. तसेच, सध्या पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत. पात्रता धारक D.ed शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती.

सप्तशृंगीगडावर चोरीचा प्रयत्न? सीसीटीव्हीला ‘चुना’, दानपेटीतील नोटा जळालेल्या अवस्थेत

परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी देखील तशी माहिती विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.   

आमदार राजेश एकडे (MLA Rajesh Ekade) आणि अन्य काही सदस्यांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, त्याबरोबरच शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डी.एड आणि बी.एड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे तसेच, बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली आहे, असे वारंवार सांगितले जात होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार (unemployed) तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली. या भरतीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळेल, त्याबरोबरच ग्रामीण (rural) भागातील विद्यार्थांना हक्काचे शिक्षक मिळून शिक्षणाचा दर्जा उंचावेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

कळवणच्या कन्येची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; ‘या’ चित्रपटात साकारली मुख्य भूमिका

- Advertisment -

ताज्या बातम्या