जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वसुली ठप्प

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वसुली ठप्प

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (Nashik District Central Cooperative Bank) वसुली (recovery) ठप्प झाल्याचे चित्र असून वसुलीतून 4.41 टक्के इतकीच वसुली झाली असल्याचे उपलब्ध आकडेवारी स्पष्ट झालेआहे. गतवर्षी हीच वसुली जानेवारी महिन्यात 12.24 टक्के इतकी झाली होती.

जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या (Farmers Rescue Action Committee) झालेल्या बिऱ्हाड आंदोलनानंतर, पालकमंत्री भुसे (Guardian Minister Bhuse) यांच्या सूचनेनुसार जिल्हा बॅंकेने विविध कार्यकारी सोसायटयांकडून थकबाकीदार सभासदवार 6 टक्के, 7 टक्के व 8 टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करुन तशी माहिती मागविली आहे. वि.का. सोसायटयांकडून मात्र, ही माहिती देण्यास टाळाटळ होत आहे. दुसरीकडे याचा परिणाम म्हणून थकबाकी वसुलीवर (Recovery of arrears) झाला असल्याचे दिसून येत आहे.

त्या पत्रानंतर केवळ 4.41 टक्के इतकीच वसुली झाली आहे. मात्र,गतवर्षी हीच वसुली जानेवारी महिन्यात 12.24 टक्के होती. जिल्हा बॅंकेच्यावतीने सुरू असलेल्या लिलाव प्रक्रीया (Auction process) विरोधात पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने गत महिन्यात बि-हाड आंदोलन (agitation) केले. यावेळी आंदोलनकर्त्यांशी झालेल्या चर्चेत थकबाकीदार सभासदांना संस्था / बँक आकारणी करीत असलेला व्याजदर मान्य नसल्याने चर्चेदरम्यान थकबाकीदार सभासदांचे थकीत बाकीवर 6 टक्के, 7 टक्के व 8 टक्के दरम्यान व्याज सवलत मिळण्याची मागणी केली.

या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी थकबाकीदार सभासदावर 6 टक्के , 7 टक्के व 8 टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करुन तशी माहीती मागविवावी ,असे आदेश दिले. या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने जिल्हाभरातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना पत्र देत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेश देऊन दोन आठवडयाचा कालावधी उलटला असून सोसायटयांकडून माहिती दिली जात नसल्याचे समोर आले आहे.

एका बाजूला सोसायटयांकडून माहिती मिळत नाही, दुसरीकडे मात्र, बॅंकेची वसुली बंद पडली असून आर्थिक फटका बसत आहे. सदर पत्र मिळाल्यानंतर 16 जानेवारीपासून बॅंकेची थकबाकी वसुली जवळपास ठप्प आहे. 16 ते 30 जानेवारी या दरम्यान केवळ 4 कोटी 4 लाख रूपयांची (4.41 टक्के) वसुली झाली आहे. गतवर्षी जानेवारी 2022 महिन्यात 12.24 टक्के वसुली झाली होती. कडक वसुली मोहिमेतंर्गत साधारण दिवसाला 70 ते 80 लाख रूपयांची बॅंकेची वसुली सुरू होती. मात्र, या पत्रानंतर वसुलीचे प्रमाण निम्यावर आल्याचे चित्र आहे.

झालेली वसुली कंसात रक्कम लाखात

16 जानेवारी (51.33), 17 जानेवारी (60.91), 18 जानेवारी (33.78), 19 जानेवारी (36.61), 20 जानेवारी (52.03), 21 जानेवारी (10.77), 24 जानेवारी (37.51), 25 जानेवारी (45.05), 27 जानेवारी (28.56). 28 व 29 जानेवारी (शासकीय सुट्टी).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com