कोट्यावधींची थकबाकी वसूल; मनपा तिजोरीत घसघशीत कमाई

कोट्यावधींची थकबाकी वसूल; मनपा तिजोरीत घसघशीत कमाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार ( NMC Administrator / Commissioner - Ramesh Pawar ) यांच्या दणक्यानंतर करवसुली विभाग (Tax Collection Department )अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. आता पर्यंत 210 कोटींची घरपट्टी( House Tax ), पाणीपट्टीची ( Water Bills )थकबाकी वसूल करण्यात आली आहे.

बड्या थकबाकीदारांकडे विशेषतः शासकीय कार्यालयांकडे थकबाकी वसुलीसाठी तगादा सुरू आहे. नाशिकरोड दिवाणी न्यायालयाकडून 25 लाख, आडगाव येथील मविप्र मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाकडून 22 लाख, तर वोक्हार्ट हॉस्पिटलकडून 25 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या घरपट्टी वसुलीचा आकडा प्रथमच 146 कोटींवर गेला आहे.

पवार यांनी मनपा प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उत्पन्नवाढीच्या नवीन स्रोतांची चाचपणी करताना थकीत करांच्या वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मार्च अखेर आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे जास्तीत जास्त वसुली करण्याचे निर्देश त्यांनी करवसुली विभागाला दिले . शनिवारपर्यंत (दि. 26) पालिकेच्या तिजोरीत घरपट्टीपोटी 137 कोटी, तर पाणीपट्टीपोटी 60 कोटींचा महसूल जमा झाला होता.

पालिकेच्या करवसुलीला गेली दोन वर्षे कोरोनाचा फटका बसला असला, तरी यंदा पालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळालेले उत्पन्न हे विक्रमी आहे. मात्र, पवार यांनी प्रशासकपदाची धुरा खांद्यावर घेताना करवसुलीचा नवा उच्चांक गाठण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच वर्षानुवर्षे कर थकविणार्‍या बड्या थकबाकीदारांविरोधात कडक कारवाईच्या सूचना देताना 31 मार्चपर्यंत थकबाकी जमा करण्याचे निर्देश त्यांनी करवसुली विभागाला दिले होते.

त्यामुळे कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्यासह सहाही विभागीय अधिकारी थकबाकी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. बड्या थकबाकीदारांकडे विशेषतः शासकीय कार्यालयांकडे थकबाकी भरण्याचा तगादा लावला जात आहे. त्याचे फलित म्हणून घरपट्टीपोटी पालिकेला एकूण 145.60 कोटी, तर पाणीपट्टीपोटी 64.21 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

गाळेधारकांविरोधात कारवाई तीव्र

करोनाचे कारण देत गेली दोन वर्षे मासिक भाडे थकवणार्‍या मनपा व्यापारी संकुलातील 1,581 गाळेधारकांविरोधात मनपाने कारवाई तीव्र केली आहे. या गाळेधारकांना थकबाकी भरण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आली आहे. जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com