मजूर फेडरेशन निवडणूकीत विक्रमी मतदान; आज मतमोजणी

उमेदवारांकडून विजयाचा दावा; अटीतटीची लढत
मजूर फेडरेशन निवडणूकीत विक्रमी मतदान; आज मतमोजणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदांच्या बारा जागांसाठी रविवारी (दि.25) झालेल्या मतदानात (Nashik District Labor Federation Election )सभासदांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्यामुळे 96.73 टक्के इतके विक्रमी मतदान झाले. एकूण 1082 सभासद मतदारांपैकी 1047 सभासद मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सहा तालुक्यामधून शंभर टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.26) सकाळी आठ वाजेपासून काशी माळी मंगल कार्यालय, द्वारका या ठिकाणी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या आर्ट, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालयात 14 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये येवला, सिन्नर, चांदवड, त्र्यंबक या तालुक्यातून 100 टक्के मतदान झाले तर देवळा, कळवण, दिंडोरी तालुक्यातून 99 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले.

मतदान प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी तसेच मतदारांनी मतदानप्रक्रिया शांंततेत पार पडण्यासाठी सहकार्य केले. सरकारवाडा पोलिसांतर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साजन सोनवणे स्वत: बारकाईने लक्ष ठेवून होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश महंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. पी. गायकवाड हे काम पाहत आहेत. त्यांना संंजय लोळगे, संजय बडवर यांचे सहकार्य लाभत आहे. मतदान व मतमोजणीसाठी शंभर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मजूर फेडरेशनच्या 20 संचालकपदांपैकी 8 तालुका संचालकपदांवर बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 7 तालुका संचालक आणि 5 जिल्हास्तरीय संचालक अशा एकूण 12 जागांसाठी 36 उमदेवार रिंगणात आहेत.

तालुकानिहाय मतदान कंसात मतदार

नाशिक 243 (247), मालेगाव 108 (111), दिंडोरी 54 (56), इगतपुरी 49 (53), त्र्यंबकेश्वर 28 (28), सिन्नर 63 (63), येवला 89 (89), सटाणा 90 (95), निफाड 100 (108), देवळा 45 (46), चांदवड 56 (56), कळवण 44 (45), सुरगाणा 20 (20),नांदगाव 47 (54), पेठ 11 (11). एकूण - 1047 (1082

अशा रंगल्या लढती

जिल्हास्तरीय जागा : इतर मागासवर्गीय प्रवर्ग - पवन आहिरराव, अर्जुन चुंभळे, संदीप थेटे, मिलिंद रसाळ. अनुसूचित जाती-जमाती - शशिकांत उबाळे, हेमंत झोले, किरण निरभवणे, उत्तम भालेराव, रविकांत भालेराव, अशोक रोकडे. भटक्या विमुक्त जाती-जमाती - बन्सीलाल कुमावत, राजाभाऊ खेमनार, आप्पासाहेब दराडे, सुरेश देवकर, सुदर्शन सांगळे. महिलांसाठी राखीव प्रतिनिधी (दोन जागा) - दिप्ती पाटील, अनिता भामरे, कविता शिंदे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com