सोने ५६ तर चांदी ७९ हजारावर पोहचले
मुख्य बातम्या

सोने ५६ तर चांदी ७९ हजारावर पोहचले

सोने 57 तर चांदी 80 हजाराच्या घरात

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जगभरात करोना मोठ्या प्रमाणात फैलावत असतांना सोने आणि चांदीच्या किमतींत विक्रमी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 56 हजारच्या पुढे गेला तर चांदी 79 हजाराच्या पुढे जात 80 हजाराच्या जवळ पोहोचली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दोन हजार डॉलरच्या पार जात 2 हजार 58 डॉलरवर पोहोचले आहे. हा गेल्या 7 वर्षातील सर्वोच्च दर आहे. 31 जुलै रोजी सोन्याचा दर 1 हजार 973 डॉलरवर बंद झाला होता. ऑगस्ट महिन्यात तो 2 हजार 72 डॉलर या सर्वोच्च स्तरावर गेला होता. चांदीचा दर गुरुवारी 28.40 डॉलरवर गेला होता.

डिसेंबर मध्ये डिलिव्हरी होणर्‍या सोन्याच्या दरात 15 रुपयांची तेजी दिसत होती. तो 56 हजार 30 रुपयांवर ट्रेड करत आहे. गुरूवारी तो 56 हजार 015 च्या स्तरावर बंद झाला होता. आज सकाळी तो 56 हजार 347 वर सुरू झाला.दरम्यान सोने चांदीच्या दराने गेल्या 7 वर्षातील किंमत वाढीचे विक्रम मोडून काढले आहेत.

जळगावच्या स्तानिक बाजारपेठेत गुरूवारी सोने 56हजार 600 रुपये दराने विकले गेले तर शुक्रवारी मात्र सोन्याचे दर 57 हजारावर गेले होते. दरम्यान आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीमुळे सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ होत असून सोने व चांदीकडे आता गुंतवणूम म्हणून बघीतले जात असल्याचे आरसी.बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील व भंगाळे गोल्डचे भागवत भंगाळे सांगतात.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com