Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कारोना रूग्णांची वाढ झपाट्याने सुरू झाली असून आज एकाच दिवसात विक्रमी 3 हजार 338 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यात ग्रामिण भागातील सुमारे दोन हजार रूग्णांचा सामावेश आहे. मंगळवार पर्यंत हा आकडा हजारच्या आत होता. तर मृत्यूचा दरही वाढला असून सलग दुसर्‍या दिवशी सर्वाधिक 15 बळी गेले आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत जिल्ह्याचा करोना रूग्णांचा आकड्याने 1 लाख 56 हजार 899 चा टप्पा गाठला आहे. तर आता मृत्यूदरही वाढत असून मागील चोवीस तासात कोरोनाचे 15 बळी गेले आहेत. मंगळवारीही हा आकडा 15 इतकाच होता.

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज सरासरी दोन ते अडीच हजार नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल होत आहेत. बुधवारी हा आकडा अचानक 3 हजार 338 वर पोहचला आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 56 हजार 899 च्यावर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात 21 हजार 74 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आहे.

मागील चोवीस तासात 2 ह जार 224 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 36 हजार 315 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 338 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 849 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकड्याने लाखाचा आकड पार केला आहे. हा आकडा 1 लाख 903 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 191 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 46 हजार 266 झाला आहे. मालेगावात 245 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 7 हजार 726 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 2 हजार 4 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून यामध्ये आज विक्रमी वाढ झाली आहे. जिल्ह्यात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील 10 तर ग्रामिण भागातील 3, मालगाव 1 व जिल्हा बाह्य 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 262 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 2 हजार 752 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 2 हजार 576 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 99 तर मालेगाव येथील 64 आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 1,56,899

* नाशिक : 1,00,903

* मालेगाव : 7,726

* उर्वरित जिल्हा : 46,266

* जिल्हा बाह्य ः 2,004

* एकूण मृत्यू: 2,262

* करोनामुक्त : 1,36,315

- Advertisment -

ताज्या बातम्या